नावात काय आहे ?
वचन:
आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. उत्पत्ती ३:२०.
नावे देताना दैवी संकेत लक्षात घ्या : आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले. त्यामागे काही दैवी संकेत होते. “देव म्हणाला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर मी त्याला अनुरूप असा सहकारी निर्माण करीन,” उत्पत्ती २:१८. आदामाने आपल्या पत्नीला नाव देताना हा दैवी संकेत किंवा आपण म्हणू , “हि दैवी इच्छा” समजून
तिचे गुण, तिचे कार्य व भविष्यात होणारे परिणाम घोषित केले.जसे,आज्ञा भंगाच्या पापानंतर त्याने आपल्या पत्नीला दुसऱ्यांदा नाव दिले, ते नाव म्हणजे हव्वा. तो तिला हव्वा हे नाव देतो, कारण ती सर्व जीवधारींची माता होणार होती. हिब्रू भाषेत याचा अर्थ आहे जीवनाचा श्रोत.
लेकरांकडे हस्तांतरित करीत
असतो, म्हणून याकडे
गांभीर्याने पाहिले तर चांगले होईल. अर्थात त्यात दैवी सामर्थ्य व योजना ह्या गोष्टीही लक्षात घ्याव्या लागतील. तुम्ही जेंव्हा एखाद्या व्यक्तीला नाव देता तेव्हा फक्त ओळख देत नाही तर त्याला विशिष्ट व्यक्तिमत्व देत असता. नाव देताना त्या मागचे कारण, तो व्यक्ती धारण करणारे
गुण, व त्याच्या हातून घडणारे कार्य व त्या कार्याचे परिणाम या सर्वांचा उल्लेख व्हावा हे अपेक्षित आहे.
अब्राहाम |
किंवा नावाला
आशीर्वाद देणे
: अनेकदा देवाने नावे सुचवली व त्या बरोबर त्याचे कार्य व आशीर्वादही सांगितली. दाविदाला देव म्हणाला तुझ्या हातून बहुत रक्तपात झाला आहे, म्हणून तू माझ्या नामाचे मंदिर बांधणार नाहीस. पहा, तुला एक पुत्र होईल, तो शांतता प्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या चहुकडल्या शत्रू पासून विसावा देईल. त्याचे नाव शलमोन [शांतताप्रिय] असे होईल. त्याच्या कारकीर्तीत मी इस्राएलास शांती व स्वस्थता देईल. तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील; तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईन; इस्राएलावरील त्याची गादी मी निरंतरची स्थापीन. १ इतिहास २२:९–१०.
पुढे याकोबाच्या बाबतींत आपण पहातो की, त्याचा जन्म झाला तेंव्हा त्याच्या आईने त्याचे नाव याकोब [ टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ] असे ठेवले उत्पत्ती २५: २६. देव त्याला दर्शन देऊन त्याचे नाव बदलतो,
तो म्हणतो यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस. उत्पत्ती ३२:२८.
याबेस |
देव आपल्या नावाला आशीर्वादित करतो, अनेकजण याबेसच्या प्रार्थनेतून शिकू शकतील, त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेविले व म्हटले कि त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला असावा म्हणून त्याने देवाकडे आशिर्वादा साठी प्रार्थना केली व देवाने त्याला आशीर्वाद देऊन त्याच्या सर्व बांधवात प्रतिष्ठित केले. १ इतिहास ४:९–१०.
प्रार्थना: हे प्रभू येशू ख्रिस्ता माझा उद्धार केलास म्हणून मी तुझे आभार मानतो. माझ्या आई वडिलांनी मला जे नाव दिले ते काय आहे व तो आशीर्वाद काय आहे हे मला माहित नाही . तरी तू मला याबेस प्रमाणे आशीर्वादीत कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक आमेन.
रेव्ह . कैलास [आलिशा ] साठे.