वचन: तो तुझ्या हृदयाच्या
इच्छेप्रमाणे तुला देवो आणि तुझे सर्व संकल्प परीपूर्ण करो. स्तोत्र: २०–४.
मंदिरात प्रार्थना करत असता याजक व उपस्थित लोक
त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत हि इच्छा व्यक्त
करीत आहेत कि देवाने त्याची
प्रार्थना ऐकावी व त्याचे सर्व
संकल्प सिध्दीस न्यावेत. हे स्तोत्र दावीद
राज्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आहे. त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने पराभव पाहिला नाही ह्याचे रहस्य या स्तोत्राद्वारे प्रगट
होते.
देव आपल्या बाजूने असणे आवश्यक आहे: दावीदाकडे भरपूर सैन्य सामर्थ्य होते, रथी, महारथी अशा महावीरांची त्याच्याकडे वाण नव्हती. दावीदाच्या साधारण इच्छेसाठी प्राण पणाला लावणारे योध्ये त्याच्याकडे होते. एकदा दावीद राजा गडांत असता त्याने इच्छा व्यक्त केली की बेथलहेमच्या वेशीजवळील
विहिरीतले पाणी कोणी मला प्यावयास दिले तर किती बरे
होईल. तेव्हा तेथे असलेल्या तिघा महावीरांनी त्याची हि इच्छा जाणली
व आपल्या जीवाची पर्वा न करता पलिष्ट्यांच्या
छावणीत घुसून त्या विहिरीचे पाणी त्याच्यासाठी आणिले २ शमु २३:
१३–१७. असे जीवाला जीव देणारे योद्धे त्याच्या पदरीअसल्यामुळे. दावीद राजाला आपल्या सैन्य सामर्थ्यवर व पराक्रमी योद्धयांवर
पूर्ण भरोसा आहे, परंतु युद्धात जय केवळ सैन्य
सामर्थ्याने शक्य नाही तर यहोवा परमेश्वराच्या
साह्याने शक्य आहे हे तो जाणत
होता, म्हणून लढाईला जाण्यापूर्वी तो देवाचे साहाय्य
मागतो. आपण सुद्धा सर्व प्रकारे स्वतःला प्रबळ करावे बुद्धी, शक्ती, अर्थ, राजकीय सामर्थ्य व सामाजिक प्रतिष्ठा
प्राप्त करावी. परंतु या सर्वावर अवलंबून
कधीच जीवन जगू नये किंवा जीवनातील महत्वाचे प्रसंग हाताळू नयेत, तर स्वतःला नम्र
करून देवाच्या साहाय्याने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जावे म्हणजे यश प्राप्ती होईल.
देवाच्या नावाचा अभिमान बाळगा: दावीदाला देवाच्या नावावर प्रचंड अभिमान होता, तो देवापुढे नम्र भावाने वागत असे, स्वतःला मेंढरू
व देवाला त्याचा मेंढपाळ समजत असे. स्तोत्र २३ हे देवा पुढे त्याचा नम्रभाव, विश्वास व प्रीती किती
प्रबळ होती हे दाखवते.
तो म्हणतो कोणी रथाची कोणी घोड्यांची प्रशंसा मिरवतात आम्ही तर आमचा देव
याच्या नावाची प्रशंसा करू.स्तोत्र २०:७. त्याच्या हृदयात देवाला फार मोठे स्थान होते. त्यामुळेच देवाने त्याला मेंढरांच्या मागून उचलून इस्राएलचा राजा बनवले होते. देवाने त्याचे हृदय पाहिले होते १ शमू १६: ६-१३.
सुध्दा दाविदाप्रमाणे प्रभू येशूवर संपूर्ण विश्वास ठेवावा व त्याचावर पूर्ण
मानाने पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने
प्रीती करावी. म्हणजे प्रत्येक युद्धात जय मिळेल. जो
त्याच्यावर विश्वास ठेवतो तो कधीच लज्जित
व फजित होत नाही. संत पौल म्हणतो,” मला सबल करणारा (ख्रिस्त) यांच्याकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे”. फिलीपै ४:१३.
देवा तू जे काही
मला दिले आहेस त्या बद्दल मी तझे आभार
मानतो. तुझे
नाव माझे सामर्थ्य व वैभव आहे .माझा आश्रयदाता तूच आहेस. तुझ्या
नामाची प्रतिष्ठा मला नित्य समजू दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.
रेव्ह कैलास [अलिशा ]साठे