प्रभू येशू येणार
वचन: तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारे येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही. उत्पत्ती १५:१६.
परमेश्वर न्यायी आहे. देव अमोरी लोकांच्या पापाबद्दल सांगतो कि, हे लोक लैगिक संबंधाबाबत कोणतेच नीतिनियम पाळणारे नाहीत, समलिंगी संबंध, पशूगमन, व्यभिचार या गोष्टी ते अगदी बिनदिक्कत करीत आहेत. लोक मूर्तिपूजा करताना स्वसंतानाला अग्निमध्ये जाळून मोलख देवाला यज्ञाअर्पण करीत आहेत. त्यांच्या या ओंगळ कर्मा मुळे तो देश विटाळला आहे याचा दोष मी या लोकांवर ठेवला असल्यामुळे हा देश (भूमी ) यांना ओकून टाकत आहे. यावरून आमच्या लक्षात येत आहे कि देव अमोरी लोकांना शिक्षा करण्याचे का योजित आहे. दुसरे कि देव प्रत्येक गोष्ट त्याच्या समयानुसार करतो, जसे कि देव जेव्हा अब्रामाशी बोलत होता तेव्हा पासून पुढे जवळजवळ पाचशे ते सहाशे वर्षाचा काळ जाणार होता या कालखंडात अमोरी लोकांच्या पापाचा घडा भरला जाणार होता. दुसऱ्या बाजूला देव अब्रामाच्या द्वारे त्याच्या राष्ट्राची निर्मिती करणार होता व या राष्ट्राला सैतानी सत्तेचा भयंकर अनुभव देऊन त्यांना देव राज्याचे म्हणजे न्याय व्यवस्थेचे महत्व पटवणार होता. व मग या वचनदत्त देशात आणणार होता. माणसाचा स्वभाव आसा आहे कि तो पाच मिनिटांसाठी विश्वास ठेवण्यास तयार नसतो. पवित्र शास्त्र सांगते कि, शेवटल्या दिवसात थट्टेखोर येतील व ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी प्रश्न उपस्थित करतील. तेव्हा विश्वासणाऱ्यानी हे लक्षात ठेवावे. कि प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आहे व हजार वर्ष एका दिवसासारखी आहेत. प्रभू त्याच्या वचनाविषयी उशीर करत नाही तर फार सहनशील होऊन कोणाचाही नाश होऊ नये अशी इच्छा बाळगीत आहे. म्हणून पश्चताप करण्याची गरज आहे. तो येईल, प्रभूचा दिवस नक्की येईल देव वचनाचा पक्का आहे. इतिहासावरून समजून घ्या.
प्रार्थाना: प्रभू येशू माझ्यावर कृपा केलीस म्हणून मी तुझे आभार मानतो. शेवटपर्यंत विश्वासी जीवन जगण्यास मला सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो, आमेन.
रेव्ह. कैलास [अलिशा ] साठे .