प्रस्तावना : आपले युद्ध जगातील कोणत्याच माणसाशी नाही, आपल्या शत्रूशी, म्हणजे आपला, छळ करणाऱ्या, आपल्या विरुद्ध खोटे बोलणाऱ्या, कोणत्याच माणसाशी अथवा संघटनेशी नाही. तर थेट सैतानाशी व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या व्यवस्थेशी आहे. कारण माणसे त्याच्या व्यवस्थेचे गुलाम आहेत, म्हणून प्रभू येशू त्याचा छळ करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांनी त्याला वधस्तंभी दिले त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करितो की,’हे देवा यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना कळत नाही.
सैतानाने अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थेत माणसांना अडकवून अंधारात टाकले आहे. त्यापैकी एक भेदभावाची व्यवस्था आहे. मानवी सहजीवनात अनेक पातळ्यांवर आपण भेदभाव पाहतो. त्याचा खरा श्रोत सैतान आहे.
भेदभाव सैताना कडून आहे: यासाठी आपण बायबल मधील एक प्रसंग समजून घेऊ. एकदा येशू ख्रिस्त शोमरोनाच्या प्रदेशात गेला, तेव्हा त्याने विहिरीवर पाणी भरत असलेल्या एका शोमरोनी स्त्रीला पिण्यास पाणी मागितले. त्याला पाहून त्या स्त्रीला आचार्य वाटले कारण यहुदी शोमरोन्यानां बाटलेले व तुच्छ समजत ते त्यांच्याशी व्यवहार तर सोडाच पण त्या प्रदेशातून प्रवास देखील करीत नसत. त्यामुळे ती शोमरोनी बाई त्याला तेथे पाहून आचार्यचकित होऊन म्हणाली, तूं यहुदी असता मी जी शोमरोनी बाई आहें, त्या माझ्यापासून पाणी प्यायला मागतोस हें कसें ? योहान ४:९.
ख्रिस्तामध्ये भेदभाव नाही: प्रभू येशू त्या स्त्रीला म्हणाला, देवाचे दान तुला कळले असते, आणि मला पाणी दे, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्यापाशी मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते योहान ४: १०. ती स्त्री सैतानाने पेरलेल्या भेदभावाच्या व्यवस्थे मध्ये जीवन जगत होती, त्यामुळे ती देवाचे मानवाला दान असलेल्या जीवनदात्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकली नाही.
देव कधीच भेदभाव करीत नाही. उलट तो सैतानाने पेरलेले भेदभाव संपवतो. देवाचे वचन सांगते,”ख्रिस्त येशू वरच्या विश्वासाकडून तुम्ही सर्व देवाचे मुलगे आहा, कारण जितके तुम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावला आहा, तितकें तुम्हीं ख्रिस्त पांघरला आहां, त्यां तुम्हांत कोणी यहूदी नाहीं किंवा हेल्लेणी नाही, कोणी दास नाही किंवा स्वतंत्र नाही, कोणी पुरुष नाही किंवा स्त्री नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये एक आहा, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि वचनाप्रमाणे वतनदार आहा.” गलती :३:२६-२९, या वचनावरून स्पष्ट होते जातीपातीची किंवा कुठल्याही भेदभावाची व्यवस्था हि सैतानापासून आहे. अशा व्यवस्थेला त्यागून ख्रिस्तामध्ये ऐक्यतेची व्यवस्था अंगीकारणे यातच मानवाचे कल्याण आहे.
सैतानाला हरवण्यासाठी प्रीतीमध्ये जीवन जगा: जेव्हा आपण सैतानाच्या विचारधारेने वागतो, तेव्हा त्याचा अधिकार आपल्यावर येतो व आपण त्याच्या बंधनात अडकतो, आणि आपले जीवन शांतीला, आनंदाला व खऱ्या समृद्धीला मुकते. कारण आपण सैतान हा फुटी पडणारा, तो चोरी, घात, व नाश करण्याचे काम करतो. परंतु प्रभू येशू विपूल जीवन देतो योहान १०:१०, बायबल सांगते, यहोवाचा आशीर्वाद धनवान करतो, आणि तो त्याबरोबर दुःख देत नाही. नीतिसूत्रे १०:२२.
म्हणून सैतानाच्या पाशात अडकायचे नसेल व खरी समृद्धी हवी असेल तर सैतानाविरुद्ध युद्ध पुकारा व त्याचे पाश तोडून टाका. बायबल सांगते,”प्रियांनो, “आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे, आणि जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि देवाला ओळखतो.” ‘जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो.’ १ योहान ४:७-१०,१६, प्रीती मध्ये विजय आहे रोम ८:३१-३९. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठीकी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन असावे ,योहान ३:१६.
रेव्ह आलिशा साठे.
=========================================================================