वचन: यहोवा थोर व परम स्तुत्य आहे आणि त्याचा महिमा शोधणे अशक्य आहे.स्तोत्र १४५:३.
देव त्याच्या कर्तृत्वाने व व्यक्तित्वाने इतका मोठा आहे कि मानवी बुद्धीला त्याचे आकलन होत नाही,तोअति थोर व परमस्तूत्य आहे. दावीद राजा म्हणतो,”देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा स्तोत्र ३४:८. त्याची हि थोर-वी त्याच्या लेकरांना संपन्न करते, त्याची दया, करूणा, क्षमा, कृपा, शांती, आ-नंद, प्रीती, न्यायीपण, ज्ञान, सामर्थ्य, व बरकत, चांगुलपणाची हि यादी खूप मोठी होऊ शकते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुरूप तो प्रगट होतो.त्याच्या थोरवीची हि किमया न्यारी आहे, ज्याला समजली त्याचे जीवन त्याच्या स्तुतीने भरून जाते.
प्रार्थना : हे प्रभू येशू तुझी महिमा अगाध आहे, तू जो परोमोच्च परमेश्वर त्यातूला मान, सन्मान, व गौरव सदासर्वदा असो. तुझ्या प्रितीने माझे तारण कर, तुझ्या आगापे प्रेमाने मला भर, तुझ्यावर पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने मी प्रीती करावी म्हणून मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर.येशूच्या नावाने मागतो.आमेन.
रेव्ह कैलास [अलिशा ]साठे
वचन: हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, स्तोत्र ६२:५.
दावीद राजाच्या जीवनातील संघर्ष पराकोटीचा होता, बाहेरील शत्रूं बरोबरच अतंर्गत शत्रूं होते, त्यामुळेअतंर्गत षडयंत्रकारी,अंतःकरणात शाप देणारे व कपटी लोकांचे पाताळयंत्री राजकारण तोअनुभवत होता.आशा परिस्थितीत भयभीत होणे,काळजी चिंतांनी ग्रस्त होणे साहजिक आहे . स्वभावतः आशा वेळप्रसंगी मनुष्य काहीही करू शकतो, उदाहरणार्थ जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करणे, इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न करणे व काहीच साध्य होत नाही असे वाटल्यास आत्महत्ये सारखा अत्यंत चुकीचा निर्णय घेणे, आशाने जीवनातील प्रश्न सुटत नसतात तर अधिक वाढत जातात. दाविदराजाने आपल्या संघर्ष पूर्ण जीवनात वेळो वेळी देवाचे साहाय्य अनुभवले मोठं मोठी संकटे व आव्हाने असताना देवाने अद्भुत रित्या त्यास जय दिले.त्यामुळे तो भयभीत ना होता, विचलित न होता, स्वतःच्या जीवाला धीर देत अगदी शांतपणे देवावर भिस्त टाकून स्वस्थ राही. प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात संकटे येतात परंतु जगिक बुद्धीच्या लोकांपेक्षा विश्वासणारे अधिक सहजतेने संकटाना सामोरे जातात व मात करितात कारण ते देवावर आपली भिस्त ठेवतात.
प्रार्थना: हे प्रभू येशू तू माझा बळकट दुर्ग व सामर्थशाली बाप आहेस,दाविदाप्रमाणे मलाही तुझ्या ठायी स्वस्थ जीवन लाभुदे. येशूच्या नावाने मागतो,आमेन .
रेव्ह.कैलास [अलिशा ] साठे .