पौलाच्या देहातील काटा

प्रभू येशूची कृपा

वचन: माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते
२करिंथ १२:९

प्रास्ताविक: माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. हे प्रभू येशूचे शब्द पौलाला काय शिकवत आहेत. प्रभू येशू त्याला काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. हे जर समजून घ्यायचे असेल तर, मग आपल्याला हे समजून घ्यावे लागेन कि अशी कोणती गोष्ट होती कि जिच्या मुळे संत पौल अस्वथ झाला होता देवाकडे ती गोष्ट त्याच्या जीवनातून काढून टाक अशी देवाकडे प्रार्थना करत होता.

प्रेषित पौलाच्या आत्मिक जीवना बद्दल, प्रेषितपणाच्या अधिकाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते
तो दैहिक असल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला २करिंथ १०:. तो पत्रे चांगले लिहितो, पण तो शरीराने अशक्त त्याचे बोलणे तुच्छ आहे अशाप्रकारे त्याला हिनवले गेले २करिंथ १०:१०.

पौलाच्या देहातील काटा : पौलाचे पाचारण त्याचे आत्मिक ज्ञान सामर्थ्य हे दैवी होते, परंतु काही खोटे शिक्षक त्याच्या विरुध्द सातत्याने अपप्रचार करत होते. त्यातूनच त्याच्या पुढे काही चिंता काळज्या निर्माण झाल्या होत्या त्या अनुषंगाने तो खूप अस्वस्थ होता. त्यामुळेच त्याच सांत्वन होणे या परिस्थितीतून त्याने बाहेर पडून समोर असलेली सेवा पुढे घेऊन जाणे हे 
खूप 
मोठे आव्हान होते. या परिस्थितीवर त्याने कशी मात केली हे समजून घेणे हे सेवाकार्यात असलेल्या सेवकांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे

त्याने त्याचे आत्मिक जीवन ज्ञान, त्याची सुवार्तेवरील निष्ठा, त्याचा प्रेषितपणाचा हक्क हे कसे श्रेष्ठ आहे हे निक्षून सांगणाचा प्रयत्न केला. खरे पाहता त्याच्यावरील टीकेला तो भीक घालत नव्हता.त्याने स्वतःला मंडळींच्या आत्मिक वृद्धी साठी झोकून दिले होते. आपले सर्वस्व पणाला लावून तो मंडीळीला शुद्ध कुमारी असे ख्रिस्तासाठी उभे करण्यास रात्रंदिन झटत होता. परंतु ह्या खोट्या शिक्षकांमुळे मंडळी अडखळली जाईल अशी त्याला भीती वाटत होती. करिंथ ११:,,. हेच श्यल्य त्याला काट्या प्रमाणे टोचत होते.

प्रार्थने द्वारे आव्हानांवर मात करणे : तो प्रभू येशूकडे प्रार्थना करीत असता त्याला उत्तर मिळाले कि माझी कृपा तुला पुरी आहे. कारण माझी शक्ती अशक्त पणात पूर्ण केली जाते. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत होता कि या खोट्या प्रचारापुढे तू हतबल होऊ नको. त्यांना जे करायचे ते करुदे मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या अशक्त पणात तुला सामर्थ्य देणारा.

प्रार्थना
हे प्रभू येशू तुझ्या योजना तुझे संकल्प उत्तम आहेत. त्या पूर्ण करण्यासही तू 
समर्थ आहेस. म्हणून विरोध करणाऱ्यांकडे लक्ष देता 
मी आनंदाने तुझी सेवा करावी असे सामर्थ्य तू मला दे .येशूच्या नावाने मागतो, आमेन.

Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browser
Disable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole