💚बालकांचे अथवा लहान मुलांचे समर्पण 💚
सुरवातीची प्रार्थना:
आराधना :
संदेश :
💜समर्पण विधीची सुरवात💜
आई वडिलांचे मुलासह संचालन : [ पुढे येत असताना “होईल वृष्टी कृपेची ” हे गीत कॉयर गाईल ]
पाळक: आईवडिलांना / किंवा पालकांना मुलाला / मुलीला घेऊन पुढे येण्यास सांगतात.
पाळक : प्रिय चर्च, पवित्र शास्त्रामध्ये [मत्तय :१९: १३-१४] मध्ये सांगितले आहे. “त्याने बाळकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. परंतु शिष्यानी आणणाऱ्यांना दटावले. येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे”.
पाळक: [ आई वडिलांना उद्देशून / पालकांना उद्देशून ] आपण आपल्या मुलाचे / मुलीचे देवाच्या हाती समर्पण करीत आहात हि अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण तुम्ही या मुलाला / मुलीला, त्याचे / तिचे देवाला समर्पण करण्यासाठी येथे आणून इतर लोकांना आपल्या ख्रिस्ती विश्वासाची साक्ष देता. त्याचप्रमाणे या मुलाला / मुलीला, त्याच्या / तिच्या जीवनात आरंभीच देवाची ओळख व्हावी हि इच्छा यावरून प्रगट करता. त्याने/ तिने, आपल्या जीवनाच्याव्दारे देवाचे गौरव त्याच्या आज्ञा पाळून करावे अशी तुमची इच्छा दाखवता. त्याने / तिने ख्रिस्तावरील विश्वासाचे जीवन जगून आपले तारण साधावे अशी आपली इच्छा दाखवता हे खरे आहे कारण आपण प्रौढ ख्रिस्ती आहात मला व मंडळीला माहित आहे. तरी तुम्ही आपल्या मुलाच्या / मुलीच्या समर्पणाचा हा हेतू देवापुढे व मंडळींपुढे घोषित करावा हे योग्य आहे.
आई वडील: होय आम्ही प्रार्थना पूर्वक हे हेतू मनात ठेऊन, आमच्या मुलाचे / मुलीचे समर्पण करण्यासाठी देवापुढे व मंडळींपुढे उपस्थित आहोत.
पाळक: तुम्ही आपल्या मुलाच्या / मुलीच्या समर्पणामागील उद्देश देवासमोर व मंडळीसमोर घोषित केला आहे. म्हणून मी देवाचा सेवक या नात्याने तुमच्या जीवनासाठी देवाला धन्यवाद देतो व आपणास व मंडळीस काही सूचना करितो.
१] तुमच्या मुलाला / मुलीला देवाविषयी शिक्षण देण्यात दिरंगाई करू नका तर लवकरात लौकर त्याला / तिला देवाविषयी शिक्षण द्या.
२] त्याने/ तिने, आपल्या जीवनात येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून लवकरात लौकर ओळखावे व त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याला अनुसरावे म्हणून मार्गदर्शन करा.
३] त्याचे / तिचे, कोवळे मन पवित्र शास्त्राकडे लागेल असे करा.
४] त्याला / तिला, असे मार्गदर्शन करा की तो / ती देवापासून बहकून जाणार नाही.
५] त्याला / तिला दुष्ट संगत व वाईट गोष्टींपासून दूर राहता यावे यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करा.
६] त्याला / तिला देवासाठी जगण्यास व त्याचे आज्ञापालन करण्यास शिकवा.
७] त्याला / तिला संपूर्ण पवित्रतेचा अनुभव मिळून , ख्रिस्तसदृश जीवन जगण्यास देवाची कृपा लाभावी म्हणून आग्रहाने सतत प्रार्थना करा.
☝ हे सर्व तुम्ही आई वडील या नात्याने, देवाच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न कराल का ? करणार असाल तर, “होय मी करीन”असे उत्तर द्या
आई वडील : होय, आम्ही / मी हे करू / करीन.
पाळक: मी आता मंडळीला प्रश्न विचारतो.
१] मंडळी या नात्याने तुम्ही या आई वडिलांना / पालकांना सहाय्य कराल का ?
२] ते दिलेल्या वचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना तुम्ही त्यांना उत्तेजन द्याल का ?
३] या मुलाची / मुलीची ख्रिस्ती म्हणून वाढ संपूर्ण पवित्रतेत व ख्रिस्त सदृश प्रौढतेत, परिपक्कवतेत होण्यासाठी, प्रार्थना, मार्गदर्शन व उत्तेजनासहित सर्वोतोपरी त्याला / तिला सहाय्य कराल का ?
☝वरील सर्व गोष्टी करणार असाल तर, “होय हे सर्व आम्ही करू” असे उत्तर द्या.
मंडळी : होय आम्ही हे सर्व करू.
पाळक: आता कृपया आई वडिलांनी मुलाचे / मुलीचे नाव देवासमोर व मंडळीसमोर सांगावे अशी त्यांना विनंती करितो.
आई वडील : [ उदाहरण: आमच्या मुलाचे/ मुलीचे नाव आमोस / सारा आहे ]
💑समर्पण 💑
पाळक: [ उदाहरण : मी देवाचा सेवक या नात्याने आमोस / सारा तुझे समर्पण पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने करतो. आमेन.]
पाळक समर्पणाची प्रार्थना करतील: [ उदाहरण : हे स्वर्गीय पित्या, तू आमोसला/ साराला आपल्या प्रेमळ पंखाखाली घे. अशी आम्ही तुला विनंती करितो. त्याला/ तिला तू तुझ्या स्वर्गीय कृपेचा आशीर्वाद दे. सर्वप्रकारच्या दुष्टते पासून व मोहापासून त्याला / तिला दूर ठेव. त्याचे / तिचे रक्षण कर. त्याने / तिने प्रभू येशूवर तारणासाठी विश्वास ठेवावा व पवित्र जीवन म्हणून त्याचे / तिचे सहाय्य हो. जसा तू ज्ञानाने, शरीराने वाढला व मनुष्याच्या व देवाच्या कृपेत वाढत गेला तसे त्याने / तिने वाढावे म्हणून तुझी कृपा त्याला / तिला पुरिव. त्याने / तिने संपूर्ण पवित्रतेच्या अनुभवात ख्रिस्त सदृश जीवन जगावे, तुझे आज्ञापालन हे त्यांचे ध्येय असावे म्हणून सहाय्य कर.
त्याचे / तिचे आई वडील अनमोल व जेनिफर यांना तू विशेष सहाय्य कर, यासाठीकी त्यांनी तुझ्या समक्ष व मंडळी समक्ष, अमोस / सारा विषयी समर्पण करताना दिलेली वचने पाळावी, त्यांनी कृतीतून ख्रिस्ती परिपक्कवतेचे उदाहरण अमोस / सारा समोर ठेवावे, व त्याच्या / तिच्या आत्मिक वाढीसाठी सतत प्रार्थनेत राहावे.
मंडळी साठीही प्रार्थना करितो की आज तिने जी वचने अमोस / सारा च्या समर्पणाच्या वेळी दिली आहेत ती पाळण्यास तिचे सहाय्य हो. मंडळीने एक्येता, प्रीती व पवित्र जीवनासाठी उदाहरण असावे म्हणून तिच्यावर विशेष कृपा कर.
प्रभू येशू आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
शेवटी आभाराची प्रार्थना:
प्रभूची प्रार्थना :
आशीर्वाद :
रेव्ह . कैलास साठे