चर्च ऑफ नॅझरीन, हडपसर: गुड फ्रायडे सेवा 2026

वचन– ‘खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले. ‘ यशया 53:5
स्वागत
सुरुवातीची प्रार्थना
आराधना
१ आशा मेरी
हम मैं वह दूरी थी कितनी गहरी
कितना बढ़ा था वो फासला
मायूस होकर स्वर्ग की ओर देखा
निराशा में तेरा नाम लिया
अंधकार हटाकर तेरी मोहब्बत
से मेरा दिल तूने भर दिया
पूरा हुआ सब लिखा गया अंत
यीशु मसीह, तू है आशा मेरी (2)
किसने था सोचा की ऐसी दया
मिलेगी हमको भरपूर से
युगों का राजा
महिमा को छोड़कर
अपनाया मेरे शर्म और गुनाह
क्रूस से मैंने पायी है माफ़ी
मैं हो गया उस राजा का
सुंदर मसीहा अब मैं हुआ तेरा
यीशु मसीहा, तू है आशा मेरी (2)
हाल्लेलुया, प्रभु तेरी स्तुती हो
हाल्लेलुया, तूने हराया मृत्यु को
तूने तोड़ी हर ज़ंजीर
तेरे नाम में रिहाई
यीशु मसीह तू है आशा मेरी (2)
आई वो सुबह वादा पूरा हुआ
बेजान शरीर ने फिर साँसे ली
ख़ामोशी में से तूने पुकारा
कब्र तेरी जीत है कहाँ (2)
येशुआ तेरी जय हो सदा
हाल्लेलुया, प्रभु तेरी स्तुती हो
हाल्लेलुया, तूने हराया मृत्यु को
तूने तोड़ी हर ज़ंजीर
तेरे नाम में रिहाई
यीशु मसीह तू है आशा मेरी
यीशु मसीह, तू है आशा मेरी (2)
२ मी वेचिले फुलांना
मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले……… 2
जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले……….. 2
1)
हाती पायी खोल तुझिया
रुतले खिळे धुतारी……… 2
मी रोग मुक्त झालों
फटके तुला मिळाले
जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले……….. 2
2)
पाहुनी येशू तुझला
धिक्कारले जगाने……… 2
पावे कृपा मी आता
शापच तुला मिळाले
जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले……….. 2
मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले……… 2
जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले……….. 2
मला सर्व रे मिळाले……….. 2
३ जय जय प्रभू येशू की
जय जय प्रभु यीशु की (2)
हमको बचाने आया जगत में
उसकी स्तुति करो
गाओ खुशी के गीत, हाल्लेलुयाह आमीन (4)
हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शान्ति आराम
आएगा वह लेने तुमको भी, रहना तुम तैयार (2)
खून की धरा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप,
धो लो अब तुम अपने हृदय को, उसमें रहे न दाग (2)
ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार,
उसको बना लो खेवनहारा, नैयया लगा लो पार (2)
वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ
आशा मेरी अब तो यही हैै ,चलो तुम मेरे साथ (2)
४ तोह गाओ हाल्लेलुया
Verse 1 :
यीशु ने हमें छुड़ाया हैं
पापों के जाल से
यीशु ने हमें बचाया है
शैतान की चाल से
Chorus :
तो गाओ हालेलुयाह
Verse 2 :
हमने शांति पायी है
यीशु के नाम से
हमने पायी है क्षमा मुक्ति श्रापों से
Verse 3 :
अब हम ना डरेंगे
यीशु जो साथ हैं
शैतान से हम लड़ेंगे
यीशु के नाम से
Bridge :
शालोम शांति और सलाम
लाए है आप के नाम
शालोम शांति और सलाम
मेरे यीशु का पैग़ाम
५ हल्लेलूया स्तुती करेंगे
हालेलुय्याह स्तुति करेंगे,
यीशु की स्तुति करेंगे
हा… हालेलुय्याह ( 6 )
1.क्रूस पर बलि द्वारा
अपना लहु बहाया
पाप को हटा कर साफ है किया,
हम को बचा लिया
2.इस जीवन भर में
सदा तुझको ध्यान करूँगा,
तेरी आत्मा पाके तेरी इच्छा जान के
आगे ही बढ़ता रहूँगा
3.यीशु के पास आओ,
और मुक्ति को अपनाओ
आशीष वह देगा, साथ अपने लेगा,
कभी नहीं छोड़ेगा
स्तोत्रसंहिता वाचन २२
दु:खाची आरोळी आणि स्तुतिगीत
1 माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.
2माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही.
3तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्या, तू पवित्र आहेस.
4आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास.
5ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत.
6मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे.
7मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात;
8ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.”
9परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस; मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस.
10मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे; मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस.
11माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे; आणि साहाय्य करणारा कोणी नाही.
12पुष्कळ गोर्ह्यांनी मला वेढले आहे; बाशानातील दांडग्या गोर्ह्यांनी मला घेरले आहे.
13फाडून टाकणार्या व गर्जना करणार्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत.
14मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे.
15माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस.
16कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत.
17मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात.
18ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात.
19तर तू, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नकोस; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.
20तू माझा जीव तलवारीपासून सोडव; कुत्र्याच्या पंजांतून माझा प्राण सोडव.
21सिंहाच्या जबड्यापासून मला वाचव, रानबैलांनी मला शिंगांवर घेतले असता तू माझा धावा ऐकलास.
22मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन.
23अहो परमेश्वराचे भय धरणार्यांनो, त्याचे स्तवन करा; याकोबाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचा गौरव करा; इस्राएलाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा.
24कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखली नाही व तिचा वीट मानला नाही. त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर पीडिताने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला.
25महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करतो; त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन.
26दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील; तुम्ही चिरंजीव असा.
27दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील.
28कारण राज्य परमेश्वराचे आहे; तोच राष्ट्रांचा शास्ता आहे.
29पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल.
30त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील; पुढील पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील.
31तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.
प्रेषितांचा मत्तांगीकार
सर्व समर्थ देव जो पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता
आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू ,
जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला,
कुमारी मरिया हिजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगीले,
ज्याला वधस्तंभि खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले,
तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला, स्वर्गात चढला,
आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे,
तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे.
त्याजविषयी मी विश्वास धरितो.
पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता,
पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याजविषयी मी विश्वास धरितो.
आमेन.
पहिला शब्द
शास्त्रभाग वाचन १ : आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?2कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. यशया 53: 1-2
विशेष गीत १ :
पहिल्या शब्दासाठी प्रार्थना-
पहिला शब्द – पास्टर शारदा साठे
‘तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’ लूक 23:33-34
दुसरा शब्द
शास्त्रभाग वाचन २– 3तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही.4खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. यशया 53: 3-4
विशेष गीत २ : तू वैभवाने जेव्हा
तू वैभवाने जेव्हा , येशील येशुदेवा
या लीन पामराला विसरू नकोस तेव्हा ||ध्रु||
तू गेलास कृसावरी,पाप्याला तूच तारी |
तू जीवनाचा ठेवा आहेस येशूदेवा ||1||
तू जीवनाचा झरा , अमुचा आधार खरा |
हृदयात तू असावा , करतो तुझा मी धावा ||2||
दुसऱ्या शब्दासाठी प्रार्थना:
दुसरा शब्द : उद्देश साळवी
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” लूक २३:४३
तिसरा शब्द
शास्त्रभाग वाचन ३- खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. यशया ५३: ५-६
विशेष गीत: ख्रिस्त गुरु माऊली
ख्रिस्त गुरू माउली ग माय माझि ख्रिस्त गुरू माउली . ॥ध्रु ० ॥ पापतापसंत्रस्तजनाची अविनाशी साउली . ॥१ ॥
हाकेसरशी मज ताराया स्वर्गांतुन धावली . ॥२ ॥
पश्चात्तापें दग्ध , शरण्या , निजशिष्यां पावली . ॥३ ॥
मज पाप्यास्तव स्तंभावरच्या मरणा सरसावली . ॥४ ॥
हृदयीं माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो मावली . ॥५ ॥
ख्रिस्त ख्रिस्त जय ! ख्रिस्त ख्रिस्त जय ! भजनी मति रंगली . ॥६ ॥
तिसऱ्या शब्दासाठी प्रार्थना :
तिसरा शब्द: सुवर्णा मिस्त्री
मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” योहान १९: २६
चौथा शब्द
शास्त्रभाग वाचन ४: माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. स्तोत्रसंहिता २२ :१
विशेष गीत: शेजुळे अंकल
चौथ्या शब्दासाठी प्रार्थना: सपना
चौथा शब्द: ह्रितिक लांडगे
नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”’ मार्क:१५:३४
पाचवा शब्द
शाश्त्रभाग वाचन ५: त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्यांपुढे गप्प राहणार्या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले; जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडन करण्यात आले; असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? यशया ५३: ७-८
विशेष गीत: विजूश्री साळवी सिस्टर
पाचव्या शब्दासाठी प्रार्थना: सिस्टर प्रतिभा
पाचवा शब्द: शॅरॉन साळवी
‘ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले. ‘ योहान १९: २८
सहवा शब्द
शास्त्रभाग वाचन ६: त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली; तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. यशया ५३: ९-१०
विशेष गीत : सिस्टर सारा
सहाव्या शब्दासाठी प्रार्थना: सिस्टर एलिना
सहवा शब्द : महिमा साठे
येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. योहान १९:३०
सातवा शब्द
शास्त्रभाग वाचन ७: त्याच्या जिवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल; तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवील; त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल.ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. यशया ५३:११-१२
विशेष गीत : खरात अंकल
सातव्या शब्दासाठी प्रार्थना: माया सिस्टर
सातवा शब्द :सिस्टर रीना
‘तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला. लूक २३:४६
शेवटचे गीत: तू राज करे
उपकारस्तुतीची प्रार्थना:
प्रभूची प्रार्थना
आशीर्वाद
आभार प्रदर्शन