ख्रिस्ती मराठी आराधना गीते.

१ ] यहोवा तू है पवित्र
अति पवित्र, परमपवित्र [२]
सर्व समर्थ, सर्वज्ञ तू
सर्व व्यापी सनातन II धृ II
स्वर्ग सिहांसन,
पृथ्वी पदासानं
स्फटिकासम तव
पूर्ण चराचर II १ II
कनक मुगुट
शुभ्र वस्रांसह
नमिती वडील, आसनस्त II २ II
अद्भुत प्राणी
गाती महिमा
रात्रंदिन तव
पवित्र पवित्र II ३ II
गौरव, सन्मान, सामर्थ्य
तुझेच आहे , आमुच्या प्रभो II ५ II

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे.

२ ] वाढ दिवस हा सुखाचा जावो
येशूचे दर्शन नित्य राहो II धृ II
जीवनभर तो असो संगती
आशा व विश्वास वाढत जाओ II १ II
निरंतर प्रार्थना जीवन असावे
विजयावर विजय तुम्हां प्राप्त होवो II २ II
सुख शांती आणि दीर्घ आयुष्य
जीवन तुमचे समृध्द होवो II ३ II

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे

३ ] पवित्र आत्म्या भर मला
पूर्ण पूर्ण पूर्ण ll धृ ll
उघड माझे आत्मिक नेत्र
कळूदे मला पवित्र शास्त्र ll १ll
स्वर्गीय दाने अद्भुत गोष्ट
कळूदे सेवेचा अर्थ स्पष्ट ll२ll
माझे हे शरीर जिवंत यज्ञ
अर्पिण्या देवाला बनाव सुज्ञ ll ३ll
पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या
होउदे जीवन निरंतर प्रार्थना ll ४ll

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे

४ ] भक्ती करू आम्ही भक्ती
येशूची भक्ती करू
त्याच्या नावात आहे मुक्ती
येशूची भक्ती करू II धृ II
राजांचा राजा तो
प्रभूंचा प्रभू तो [२]
सर्व सत्ता त्याच्या हाती
येशूची भक्ती करु II१II
जीवनाची भाकर तो
जीवनाची जल तो [२]
स्वर्गाचे दार आहे येशू
येशूची भक्ती करू II२II
कष्टी व भाराक्रांत
ओझ्याने लादलेले
सर्वांची आशा केवळ येशू
येशूची भक्ती करू II३II

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे

५ ] नदी वाहते जीवनाची
पहा पवित्र आत्म्याची IIधृII
भोळ्यांनो याहो, मूढांनो या हो
जीवनी पाणी भरपूर प्या हो II१II
डुबा डुबा हो हिच्या ठायी
जीवन बहरूनी जाईल II२II
तृप्ती होईल तृप्ती होईल
जीवनी पहा फळे येतील II३II
नदी आहे हि आशीर्वादांची
शांती, प्रीतीची बहू कृपेची II ४ II
आत्मा बोलावी आत्मा बोलावी
जीवनी पाणी फुकट वाही II ५ II

रेव्ह कैलास [आलिशा ] साठे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole