
१ ] ख्रिस्त माझा तारणार ।
मला वाटे प्रिय फार. ।।1।।
ज्या ज्या वेळी होते दुःख ।
करितां धांवा देतो सुख. ।।2।।
किती नम्र प्रभू झाला ।
पापी जग तारायाला. ।।3।।
मातेपरी देतो धीर ।
म्हणे, आता तरी फीर. ।।4।।
काय सांगू त्याचे प्रेम ।
देई वारंवार क्षेम. ।।5।।
कृ. र . सांगळे
२ ] (Chorus)
ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमा त्याला
तोच आपुला तारणार या स्तवा त्याला
(Verse 1)
तो जगाचा त्राता पालक, मालक या विश्वाचा
क्रूसावरती अर्पुनी प्राणा, उठला तारायाला
(Verse 2)
तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा
अद्भुत मंत्री, देवसमर्थ, पिता सनातन अमुचा
(Verse 3)
ख्रिस्त दाता, शान्ती, प्रीतिचा, अविरत आनंदाचा
एकच वैद्य जगती हाची , दैवी आरोग्याचा
(Verse 4)
त्याचे व्हावे मनी जयांच्या, स्विकाराहो त्याला
जगदुद्धारक, जीवन, सत्य, आळवा नित्य तयाला
३ ] (Chorus)
परमेशाला स्तवा, । निरंतर ।
परमेशाला स्तवा.
(Verse 1)
नित्य तयाच्या पवित्र स्थानीं
जाउन त्याला स्तवा, ।
सामर्थ्यांचा प्रसार तयाचा
आणुन ध्यानीं स्तवा, ।
वर्णा त्याचे प्रताप,
महती गाउन त्याला स्तवा, ।
करणा, वीणा, सतार घेउन
जगदीशाला स्तवा.
(Verse 2)
वाजवुनीयां मृदंग, करूनी
नर्तन त्याला स्तवा, ।
तंत्रयंत्रवाद्यांच्या नादें
विश्वपतीला स्तवा, ।
मंजुध्वनीच्या उंचध्वनीच्या
झांजांवर त्या स्तवा, ।
प्राणिमात्र हो, स्तवा,
परेशा, परमेशाला स्तवा,
४ ](Chorus)
गजर करा गजर करा
प्रभु येशू नावाचा
विजयशाली प्रभु येशूची
घोषणा तुम्ही करा
जय घोषाने निरनंतर त्याची
स्तुती तुम्ही करा
गजर करा गजर करा
प्रभु येशू नावाचा
(Verse 1)
अहो वेशी नो उचलत व्हा
कमानी उच्च करा
राजांचा राजा येशू साठी
द्वार उघडे करा
मिठुनी सारे गाऊनी सारे
महिमा त्याची करा
गजर करा गजर करा
प्रभु येशू नावाचा
(Verse 2)
या सर्व मिठुनी आपण सारे
धन्यवाद करू
राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला
स्तुतीचे गीत गाऊ
हात उभारुनी उच्च स्वराने
महिमा त्याची करा
गजर करा गजर करा
प्रभु येशू नावाचा
(Rap)
केले येशूने असे अद्भुत काम
साऱ्या जगाचा करता झाला तो बलिदान
वाहून रक्त त्याने दिला आपला प्राण
ना भूतों ना भविष्यती कोणी त्यास समान
स्तुती करा भक्ती करा होशान्ना गा
त्यास आराधना करून देऊया सदा
तो विश्वविजेता, त्यास उच्च करा
आणि प्रभु मध्ये सर्वदा आनंद करा
Sheldon Bangera,Prashant Khawdia, Abhishek Rogers, Joy Navgire
५ ]सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीं वर, तो बाप, पुत्र, आत्मा, जाण, त्र्येकाला द्या अनंत मान. आमेन