मराठी ख्रिस्ती भक्ती गीते

१ ] येशू येशू येशू नाम गोड फार [२]
तारणारा मला कधी नाही सोडनार[2]
नाही सोडणार, नाही सोडणार [४]
तारणारा मला कधी नाही सोडनार [2] II धृ II

भय धरा धरा येशु नामाचे[४]
येशू वरिल विश्वासाने मुक्ति मिळते [2]

शरण मी आलो येशु रायाला [2]
हृदयात सुरु झाला जीवनाचा जरा[2]

२ ] यहोवाची स्तुती करा
त्याची दया सनातन आहे
प्रभूच्या प्रभूची स्तुती करा
त्याची दया सनातन आहे ————-

आजवर चालविले स्तुती करा
त्याची दया सनातन आहे
पुढेही चालविणार स्तुती करा
त्यांची दया सनातन आहे ————–1

आजवर सांभाळिले स्तुती करा
त्याची दया सनातन आहे
पुढेही सांभाळणार स्तुती करा
त्याची दया सनातन आहे ————–2

आजवर वाचविले स्तुती करा
त्याची दया सनातन आहे.
पुढेही वाचविणार स्तुती करा
त्याची दया सनातन आहे —————-3

विश्वास ठेवाल तर नाही सोडणार
त्याची दया सनातन आहे
प्रार्थनेत विजय आहे स्तुती करा
त्याची दया सनातन आहे ————–4

सामर्थ्यवान तो स्तुती करा
त्याची दया सनातन आहे
सर्वज्ञ आहे तो स्तुती करा
त्याची दया सनातन आहे ———–

(Chorus)
३ ] आज धन्य धन्य मी झालो
येशूराजा मला भेटला (२) हाल्लेलूया हाल्लेलूया
येशूराजा मला भेटला

(Verse 1)
भाराक्रांत कष्टी मी, गेलो येशु जवळी
त्याने भार माझा सर्व वाहिला
येशु राजा मला भेटला

(Verse 2)
संकटाच्या समयी, हाक त्याला मारीली
हाक ऐकताच धावुनी आला,
येशु राजा मला भेटला
( verse ३ )
भटकलो मी अंधारी
गेलो निसरड्या अशा स्थळी
पाय घसरताच
हात धरिला .

४ ](Chorus) आनंद भरला, आनंद भरला आनंद पूर्ण भरला…..हालेलूया येशूने मला वाचविले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला (Verse 1) मार्ग चुकून मी फिरलो, अंधकारात मी चाललो तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचविले उद्धार द्यायला येशू माझा स्वत: आला (Verse 2) पातकात असणारे, अंधकारात चालणारे मी स्वर्गात नवे गीत गातो आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू

५ ] (Chorus)
आधी वंदन देवा तुला
आधी वंदन ख्रिस्ता तुला
तू आहे जगा वेगळा

(Verse 1)
नाम येशूचे गोड मनाला
मुखी घेऊ सदा स्तवनाला
किती आळवू मी देवा तुला
किती आळवू मी ख्रिस्ता तुला
तू आहे जगा वेगळा

(Verse 2)
नाम येशूचे सांगू जगाला
ख्रिस्त येशू हाच तारणारा
पापी जनांना तारावयाला
तू आहे जगा वेगळा

(Chorus)
आधी वंदन देवा तुला
आधी वंदन ख्रिस्ता तुला
तू आहे जगा वेगळा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole