येशू नामाचा गजर मराठी भक्ती गीते

१ ] या हो या , जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा .

याहो या जय जयकार कराया
माझ्या ख्रिस्ताचा ll धृ ll
ख्रिस्ताचा, त्या जग उध्दाराचा
माझ्या येशूचा ll १ ll
येशूचा, देवाच्या शब्दाचा ,
माझ्या देवाचा ll२ ll
देवाचा, राजांच्या राजाचा
माझ्या बापाचा ll ३ ll

२ ] बोला राजा येशू जय बोला मुखाने
राजा येशू जय बोला ll धृ ll

जय बापा जय बोला २
जय पुत्रा जय बोला २
जय आत्म्या जय बोला २
जय त्रैक्या जय बोला २

३ ) आनंदे वाजवा टाळी
चला जाऊ ख्रिस्ता जवळी ll धृ ll
घेउनी पापांची मोळी
ठाकूया क्रूसा जवळी (x2)
ठाकूया क्रूसा जवळी (x4)
आपण पश्चाताप करू
शरण येशूला जाऊ (२ )
शरण येशूला जाऊ (४ )

४ ] घ्या हो तुम्ही टाळी घ्याहो टाळी ll धृ ll
टाळी कश्याची देव बापाची
करील तो होळी सर्व पापांची ll १ ll
टाळी कश्याची देव-पुत्राची
करील तो होळी सर्व पापांची ll २ ll
टाळी कश्याची देव- आत्म्याची
करील तो होळी सर्व पापांची ll ३ ll
टाळी कश्याची -त्रैक्य देवाची
करील तो होळी सर्व पापांची ll ४ ll

५ ) नाम नाम नाम -येशू तारकाचे नाम ll धृ ll
तारकाचे नाम येशू उद्धारकाचे नाम ll १ ll
नाम एकच नाम- नाम येशू नाम ll २ ll
नाम प्रिय नाम -नाम गोड नाम ll ३ ll

६ ] जय जय येशू माझा प्राण
मज जीवनाचे दे वरदान ll१ll
तू पतितांचा मित्र महान
वारी जीवाची दैवी तहान ll२ll

७ ] जय जय जगदीशा l
जगाला तुझी मात्र आशा ll
जय मंगल धामा l
जगावर तुझा मात्र प्रेमा ll
जय जगदाधारा l
जगाला तुझा मात्र थारा ll
जय जय विश्वपते l
जग हे तुझी वाट बघते ll
[ चाल बदलून ]

तुझी मात्र सेवा l
घडू दे जगामध्ये देवा ll
तुझे राज्य येवो l
जगी या स्वर्ग उभा राहो ll
तुलाच वंदन घे l
आमुचे वैभव तू अवघे ll
तुझ्या मात्र चरणी l
रमूदे सहस्त्र दिन रजनी ll
प्रभो परात्पर l
जय करुणाकर ll
जय जय जय बापा l
जय जय जय पुत्रा l
जय जय जय आत्म्या ll

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole